Sharad Baviskar
@baviskar_sharad
Views personal
फ्रेंचमधील 'Ineptocracy' ही संकल्पना अनेक देशांमध्ये सध्या लागू होऊ शकते. Ineptocracy म्हणजे सगळ्यात नालायक लोकांना जीवनात नालायक ठरलेल्या लोकांनी निवडून अस्तित्वात आणलेली शासनपद्धत! 'नालायकशाही' if you will!
'सर, जेएनयूत मराठी अध्यासनाचं उद्घाटन झालं. कधी अर्ज करता येईल?' एका मराठी प्राध्यापकाने फोनवर विचारलं. 'राजकारण्यांचं भूमिपूजन आणि वचनपूर्ती यात शतकांचं अंतर असू शकतं. म्हणून राजकारणी भूमीपूजनावर कायद्याने बंदी आणली पाहिजे.' त्याला म्हटलं.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज यांच्या नावाने प्रस्तावित केंद्रांचा विरोध केला नाही. त्यांचं प्रदर्शन जनसुरक्षा विधेयक आणि भाषावादाविषयी होतं. आयटी सेलचा भुरटेपणा समजू शिकतो. पण किमान माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करणं अपेक्षित आहे.
एकूणच विनोदबुद्धीचा अभाव आणि सोबतच असहिष्णुता पाहता आजपासून political jokes बंद!
काही दिवसांपूर्वीच धनकड जेएनयूत येऊन गेले. आणि उतरती कळा लागली. अशी अंधश्रद्धा आहे की जेएनयूत आल्यावर राजकारण्यांची उतरती कळा लागते. म्हणून मोदी- शहा जोडीने जेएनयूचे कार्यक्रम ऑनलाइन ठेवले! तळटीप: अंधश्रद्धा वाईट असते!
निव्वळ ध्रुवीकरणासाठी आणि विनाकारण लोकांना डिवचण्यासाठी हिंदीचा जीआर काढण्यात आला होता!
गेल्या दहा बारा वर्षांत शिक्षण क्षेत्रात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तीस वर्षे लागतील!
फ्रेंच प्रेसिडेंट जॅक शिराकवर एका क्रोधित नागरिकानं अंड मारून फेकलं. शिराक फ्रेंच नागरिककपाशी पोहचून 'Enchanté!' अर्थात 'तुम्हाला भेटून आनंद झाला' असं म्हणतो. नालायकशाहीत नागरिकाचा नेत्याच्या गुंडांनी जागेवरच मुडदा पाडला असता! परिपक्व लोकशाही विरूद्ध नालायकशाही!
हिंसेचं जनावर मोकळं सोडता येतं! पण आवरता येत नाही, हा इतिहास राहिला आहे! थोडी जरी अक्कल असेल तर वेळेत हिंसेला पायबंद घातला पाहिजे! हिंसेची जबाबदारी हिंसा लादणार्यांवर असेल! महाराष्ट्र सध्या घातक वळणावर आहे!
आमदार, खासदार, मंत्री हे सगळे नावापुरते आहेत. कायदेमंडळ नावापुरतं आहे. कायदे, धोरणं वेगळ्याच ठिकाणी वेगळ्याच लोकांकडून बनविले जातात. यांच्या हातात पत्ते खेळण्यापलीकडे काय शिल्लक आहे?
शत्रू एका मागून एक चूका करत असेल तर व्यत्यय आणू नका! --- नेपोलियन
लोकशाही संपविण्याच्या दोन पद्धती: पहिली पद्धत: विरोधकांना भीती आणि अमिष दाखवून संपवा. लोकशाहीच्या संस्था काबीज करा किंवा उध्वस्त करा! दुसरी पद्धत: अशा सांस्कृतिक जीवनाचा पुरस्कार, प्रचार आणि प्रसार करा की लोक लोकशाहीसाठी नालायक ठरले पाहिजे! दुसरी पद्धत सगळ्यात जास्त विघातक!
महाराष्ट्राचं राजकारण संपूर्ण देशात सुसंस्कृतपणासाठी ओळखलं जात असे, असं कुठंतरी वाचण्यात आलं होतं!
भागवत गीता सांगणारा कृष्ण यदुवंशी होता! रामायण लिहणारा वाल्मिकी होता! मात्र कथा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही! साले चुतिया बनाना तो कोई इनसे सिखे! असा युक्तिवाद माझ्या घरी आलेला एक कबीरपंथी इलेक्ट्रिशियन करून गेला! अशा आहेत 'आधुनिक' भारतातील चर्चा आणि प्राथमिकता!
मातृभाषेचा पाया मजबूत असला तर त्यावर नंतर कितीही भाषांचे आणि ज्ञानाचे स्तंभ उभारले जाऊ शकतात! पण मातृभाषेची उपेक्षा कुठल्याही कारणांमुळे होत असेल तर फक्त आकलनाची तकलादू झोपडपट्टीच तयार होते! असा समाज ज्ञान क्षेत्रात सतत परावलंबी राहतो!
भुरा | शरद बाविस्कर | लोकवाङ्मय गृह "दहावीत नापास होऊन जिद्द न सोडता भारतातील प्रतिष्ठीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच भाषेचे प्राध्यापक" असे थक्क करणारे, प्रेरणा देणारे प्रा. शरद बाविस्करांचे हे प्रांजळ आत्मकथन. @baviskar_sharad @LetsReadIndia @PABKTweets @KalantriPravin
शरद बाविस्कर लिखित भुरा ह्या पुस्तकाचा आढावा. pustakgiri.blogspot.com/2025/05/blog-p… @baviskar_sharad @LetsReadIndia @PABKTweets
आज आम्ही जेएनयूचे अनेक प्राध्यापक फुले चित्रपट पाहायला जाणार आहोत. मास्तर समुदायाने प्रत्येक शहरात आणि गावात पुढाकार घेऊन या चित्रपटाविषयी चर्चा घडवून आणली पाहिजे. फालतू चित्रपटांसाठी ट्रेंड चालवणारे आपले भाबडे नागरीक अशा बाबतीत घोरत पडलेले असतात.