Prafulla Wankhede 🇮🇳
@wankhedeprafull
Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
Feeling good that #LPG is now Happy Fuel for many Industries & Houses.Transformation from Fear Fuel to Happy Fuel is my life journey too. 😊😊

गेल्या दोन दशकांहून अधिक काळाचं निरिक्षण आहे….कॉर्पोरेट्समधे नंबर्सला आता प्रचंड महत्व आलंय… ते नसानसात भिनलयं! डिपार्टमेंट, आपलं काम कोणतंही असो, आपल्यामुळे कंपनीचा पैसा वाचला तरी पाहिजे नाहीतर वाढला तरी पाहिजे हेच सत्य. यापैकी काहीच होत नसेल तर जॉब सिक्युरिटी नसते.
उमेदीचा काळ असो वा स्थैर्याचा सतत स्वतःला चॅलेंज करत रहायचं….. पैसे, ज्ञान, भवतालचं आकलन आणि सर्वात महत्वाचं, बदल स्विकारण्याचं बळ, आपोआप वाढतं जातं. माणूस म्हणून आपण अधिक सक्षम बनतो. #BusinessDots
एक वेळ प्रेमाचं खोटं नाटक करता येतं. खोटं-खोटं तरीही गोड-गोड बोलता येतं. बहुतांश वेळा ते खपून जातं. परंतू द्वेष, तिरस्कार हा नेहमी आतून असतो. तो लपवता येत नाही. तो नजरेतून, हावभावातून, बोलण्यातून स्पष्ट दिसतो. दुसऱ्यांचा द्वेष आणि तिरस्कार यातून मुक्ती मिळणं यासारखं सुख नाही!
शिक्षण, विज्ञान आणि सर्वसमावेशक विचारांच्या जीवावर कोणीही सामान्य माणूस, इथेच भारतात राहून आभाळाला गवसणी घालू शकतो हा आत्मविश्वास बालपणीच मिळवून देणारे….. बालपणच काय पण जगणं समृद्ध करणारे खरेखुरे हिरो….. डॉ. अब्दुल कलाम साहेब, आपण आजही माझ्यासारख्या कित्येकांचे सुपरहिरो आहात!

पंचवीस - तीस वर्षांपूर्वी टू व्हिलर ही लक्झरी किंवा मोठेपणापेक्षा “गरज म्हणून पुढे आली” आणि सर्वांनीच ही मोटारसायकल आपलीशी केली. आता तीच परिस्थिती फोर व्हिलरच्या बाबतीत तयार होतेय. जरासं आर्थिक स्थैर्य आलं की कार घरी असणं ही बेसिक गरज बनतीये.
बोस्टन, LA, सिंगापूर, दुबई इथून हल्ली फोन येतात. रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करा म्हणून. कुठे? तर पनवेल, नवीमुंबई, ठाणे, परेल, दादर पुणे, वाकड, कोथरूड…😉😃 कचऱ्याला तरी जास्त किंमत आहे हल्ली पण Do Not Disturb वगैरे नियम म्हणजे एकदमच फालतू. घ्यायचंय तर घ्या नाहीतर फोन बंद करा. 🤦♂️
आपण ज्या इकोसिस्टमचा भाग असतो, ज्यावर आपला व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू असतो, ▪️त्या क्षेत्रात भविष्यात काय काय बदल होऊ शकतात? ▪️कोणतं नवं तंत्रज्ञान येतंय? ▪️कोणती नवी कौशल्य त्यासाठी लागतील? याचा वेळेच्या आधी अंदाज घेऊन त्यात प्रविण होणारे लोकं सहसा आर्थिक संकटात अडकत नाहीत.
चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि उत्साही मन यात खूप मोठी शक्ती आहे. या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपसुकच संपुर्ण जग आपली सोबत करतं. कामाला वेग तर येतोच पण आनंदही आपोआपच वाढतो. #BusinessDots
जुन्या वाटा जेंव्हा बंद होतात, तेंव्हा नव्या वाटा शोधता यायला हव्यात. तयार वाट, पाय वाट कि नवी वाट - आपला आपला चॉईस असतो….. प्रत्येकाचे फायदे तोटे ठरलेले. क्षेत्र कोणतेही असो नवी वाट शोधणारे, नवी दिशा देणारे जगाला हवेत. निर्णय आपल्याला घ्यायचा असतो.
कोण, कोणावर, का भूंकतोय हे महत्वाचं नाही. “सतत भूंकत राहणे” हीच यांचे जिवंतपण सिद्ध करण्याची पद्धत आहे.
As a parent, encouraging your children to select their own books and incorporating this practice into their daily routine will enhance their self-confidence. @wankhedeprafull @LetsReadIndia
इतरांशी सततची तुलना, इर्षा आणि आपल्या अपयशाबद्दल इतरांना दोष देणं बंद केलं की आपोआप स्वतःकडे लक्ष दिलं जातं. आर्थिक असो की बौद्धिक प्रगती, दोन्हींची ती खरी सूरूवात असते.
पैसा हातात नसताना आणि आल्यावरही, ‘कृतज्ञता’ हा फार महत्वाचा गुण ठरतो.
कट्टरता वाढली की विकृती येते, आणि विकृती वाढली कि अंत होतो.
अनेकांसाठी मुंबई ही फक्त “स्टॉप गॅप अरेंजमेंट” किंवा “टेंपररी ॲड्रेस” या प्रकारात मोडते. जोपर्यंत हाच “पर्मनंट ॲड्रेस” बनत नाही, तोपर्यंत या शहराबद्दल, इथल्या मातीबद्दल “कृतज्ञतेचा” भाव तयार होणं अवघड असतं. “ऑप्शनचा विषय” असला की त्याविषयी भावना कशा असतात हे काय वेगळं सांगायचं?
कोण, का, कधी, काय, कृती करतं, कोणाला बोलतं, किंवा नक्की कोणत्या वेळी माणूस जिवाच्या आकांताने एखाद्या गोष्टीवर फोकस ठेऊन काम करतो यावर एक पुस्तक आहे. नस्सिम निकोलास तालेब यांचं “स्किन इन द गेम” नावाचं. प्रॅक्टिकल आणि प्रॅगमॅटिझमवर विश्वास असणाऱ्यांनी एकदा तरी वाचायलाच हवं…..

तुम्ही कोण आहात ? कुठून आलात ? पुर्वइतिहास काय ? यापेक्षा तुमची बुद्धीमत्ता, आत्मविश्वास, एकंदर भविष्याची आस आणि प्रामाणिकपणा याला मुंबई इतके महत्व भारतात कुठेच नाही….. #आमचीमुंबई ❣️
जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!