Gajanan Patil
@patil_gajanan
CEO ZP Pune | RTs are not endorsements
पुणे जिल्हा परिषद प्रशासनासोबत संवाद साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे अभिनव माध्यम... WhatsApp ChatBot ! #PuneZillaParishad
पुणे जिल्हा परिषद... आता फक्त एका क्लिकच्या अंतरावर ! पुणे जिल्हा परिषदेने WhatsApp ChatBot या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकाभिमुख संवादाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा ? punezp.gov.in या वेबसाईटला भेट द्या, वेबसाईटवर खालच्या…
माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांनी आज पहाटे राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध नागरी समस्यांबाबत पाहणी केली. तसेच, पुणे मेट्रो फेज ३ कामाची व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपयोजनांची पाहणी करून प्रशासनास…
आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामे, जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शैक्षणिक संस्था यांची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. - वळती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या वतीने या शाळेत विद्यार्थ्यांसाठी नवीन…




एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन तत्पर आहे ! #PuneZP
एकल महिलांच्या उन्नतीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्नशील! पुणे जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिक स्थैर्य व समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन योजनेची आखणी सुरू आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर खेड तालुक्यातील ३ गावांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.…
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल चालवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने क्रिस्टल हाऊस कंपनीसोबत करार केला आहे. क्रिस्टल हाऊस कंपनीचे ग्लोबल हेड डेव्हिड हॅरीस, कंपनीचे इंडिया हेड जेसन मॅथ्यू यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन…
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनामगांव FIAT कंपनीच्या वतीने ४ वर्गखोल्या व शिक्षणासाठी उपयुक्त असे फर्निचर शाळेसाठी भेट. या सर्व सुविधांचे पुणे जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ! @patil_gajanan
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणी FIAT कंपनीच्या वतीने ४ वर्गखोल्या व शिक्षणासाठी उपयुक्त असे फर्निचर शाळेसाठी भेट. या सर्व सुविधांचे पुणे जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ! @patil_gajanan
FIAT कंपनीच्या वतीने शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी चार वर्गखोल्यांचे बांधकाम करून शिक्षणासाठी उपयुक्त असलेले फर्निचर व डिजिटल बोर्ड पुरविण्यात आले आहेत. तसेच, कंपनीच्या वतीने गावातील अंगणवाडी केंद्रासाठी नवीन इमारतीचेही बांधकाम करून देण्यात आले…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामगाव (ता.शिरूर) येथे FIAT कंपनीच्या वतीने चार वर्ग खोल्यांचे बांधकाम करून या वर्ग खोल्यांसाठी शैक्षणिक कामकाजास उपयुक्त असे फर्निचरही पुरवण्यात आले आहे. या वर्गखोल्यांचे आज पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते…
महाराष्ट्राचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, महिला व बालविकास मंत्री कु. आदितीताई तटकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ यांची आज विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने…




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांची आज विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पुणे मॉडेल स्कूल, पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र यांसह डिजिटायझेशनच्या…



पर्यटनाला चालना देणारा पुणे जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : "हेरिटेज होम स्टे" ! - किल्ले शिवनेरी व परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार. - स्थानिक शेतकरी व आदिवासींची जुनी घरे, वाडे जतन होणार. - जिल्हा परिषदेच्या उपक्रमातून स्थानिकांना उत्पन्नाचा स्रोत मिळणार.
समाज कल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिराचे ग्रंथालय / अभ्यासिकेत रूपांतर करणे साठी सोयी सुविधा पुरविणे या योजनेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील वाडा येथे हजारो पुस्तकांनी व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा…
पुणे जिल्ह्याच्या उत्तम आरोग्यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर ! पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाडा येथे भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. याठिकाणी रुग्णांसाठी कार्यान्वित असलेल्या उपचार…
पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी खेड तालुक्यातील कडधे व वाडा येथे अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, किशोरवयीन मुली व महिलांच्या…
"एकल महिला शिबिर" महिला स्वावलंबनाकडे एक सकारात्मक पाऊल! आज डॉ. सुधा कोठारी यांच्या चैतन्य संस्था, खेड यांच्या वतीने "एकल महिला शिबिराचे" आयोजन करण्यात आले. या शिबिराला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील यांनी उपस्थिती लावून एकल महिलांशी संवाद…
खेड तालुक्यातील वाडा येथे ‘मध्यवर्ती शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ खेड तालुक्यातील वाडा येथे ‘मध्यवर्ती शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण,…
मला महाराष्ट्र राज्य सेवेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या पदासाठी नामनिर्देशन प्राप्त झाले आहे. या निमित्ताने आज पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सर यांनी मला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभाशीर्वादामुळे अधिक प्रेरणा मिळाली.


पुणे जिल्हा परिषद, समाजकल्याण विभाग अंतर्गत "जिल्हा परिषद कौशल्य विकास योजना"! अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी...!