Golekar Ganesh N.
@golekarganesh
मराठा सेवक
केंद्रात मराठा समाजाला कोणते आरक्षण? केंद्रात १)SC २)ST व ३) OBC अशा तीनच सामाजिक आरक्षणाची तरतूद आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेल्या मराठा समाजाला केंद्रात कोणते आरक्षण मिळणार? राज्यातील NT चे सर्व प्रवर्ग,SBC सुद्धा केंद्रात OBC list मध्येच येते. @CMOMaharashtra

आझाद मैदानात मराठा समाजाचे सामूहिक शिष्टमंडळ दाखल... #मराठाआरक्षण #ओबीसीतूनच #कुणबी




जातीपातीच्या पलीकडे माणुसकीचे नाते असते. आज स्व.महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधून अट्टक करण्यात यावी या करीता भरपावसात ज्ञानेश्वरी ताई मुंडे रास्तारोको आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून स्व. संतोष भैय्या देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे देखील सहभागी झालेले आहेत.


आज मनोज दादा जरांगे पाटील नारायणवाडी ता. गेवराई, जि.बीड येथे समाज बांधवांशी मुंबई आंदोलना विषयी संवाद साधताना.

मुंबई मैदान पाहणी दौरा! मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील उपोषणस्थळाची पाहणी सोमवार दि.28/07/25 ला करणार आहेत.ज्यांना शक्य आहे,त्या बांधवांनी शनिवार दि.27/07/25 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत आंतरवाली सराटी येथे चारचाकी गाडीसह उपस्थिती राहावे.

ज्ञानेश्वरीताई मुंडे आपल्या पतीच्या न्यायासाठी अंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे पाटलांच्या भेटीला.

23 जुलै 2018 रोजी मराठा आरक्षणासाठी कायगाव, ता.गंगापूर, जि.छञपती संभाजीनगर येथे गोदावरी नदीत जलसमाधी घेऊन बलिदान देणारे आपले सर्वांचे मराठा बंधू हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!💐🙏🏻

आज छत्रपती संभाजी नगर 29 ऑगस्ट मुंबई दौरा यासाठी छत्रपती महाविद्यालय सिडको या ठिकाणी बैठक पार पडली आहे त्यामध्ये जिल्हा नियोजन दौरा जिल्हा जनजागृती रॅली कॉर्नर बैठका चावडी बैठका याचे नियोजन झाले आहे तसेच मुंबईसाठी हजारोंनी गाड्या संभाजीनगर वरून निघणार आहे असं नियोजनात ठरले.

जरांगे पाटलांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी! वाघोली,पुणे.

जरांगे पाटील प्रणीत मराठा आरक्षण लढ्यास दलित, धनगर, ओबीसी अशा 20 संघटनांनी आज पाठिंबा दिला.

आज पुण्यात राज्यातील धनगर व इतर समाज बांधव यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. व मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा जाहीर केला.




प्रचंड जनसमुदाय! धानोरा गावातील चावडी बैठक ता. सिल्लोड संभाजीनगर तोच दरारा कायम एकच मिशन मराठा आरक्षण चलो मुंबई 29 ऑगस्ट उगं नाही माय पाटील म्हणतात!
धानोरा, ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर. जरांगे पाटलांना भक्कम साथ. आजची चावडी बैठक...

कालची बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील अचानक जरांगे झालेल्या पाटलांच्या पारावरच्या चावडी बैठकीला तुफान प्रतिसाद मिळाला. आज पाटलांची स्वारी छञपती संभाजीनगर च्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा कडे निघाली आहे. आजचा प्रतिसाद कसा असेल?

13 जुलै काळा दिवस! 9 वे पुण्यस्मरण...! ज्या कोपर्डीच्या श्रध्दाताईच्या बलिदानाने 350वर्षानंतर मराठा समाज एका छत्राखाली एकवटला.त्या कोपर्डीच्या श्रद्धाताईला आपल्यातून निघून जाऊन आज 13जुलै 2025 रोजी 9वर्ष पूर्ण झाले. अजून किती वर्ष जाणार आहेत तिच्या न्यायासाठी? #कोपर्डी

छञपती शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारी, प्रत्येक शिवभक्तांचा आनंद द्विगुणित करणारी ऐतिहासिक घटना म्हणजे युनोस्को च्या जागतिक वारसा यादीत 12 गडकिल्ल्यांचा समावेश. हरहर महादेव.