Brijmohan Patil
@brizpatil
Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर
चला एका तरी नेत्याने मान्य केलय पुण्याच वाटोळ झालय म्हणजे सुधारणेला वाव आहे. हे १०-१५ वर्षापूर्वी हिंजवजीत व्हायला पाहिजे होते ते आता होतय. हिंजवडीच्या कारभार्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवणे गरजेचे आहे. #pune #hinjawadi #PuneRains #punenews #पुणे
#पुणे महापालिकेचे कर्मचारी मेट्रोने प्रवास करताना अशी खुर्ची वापरत आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळी उपयोगी पडते असे कनिष्ठ अभियंता अनिल लोखंडे सांगत होते. #pune #punemetro #punetraffic @metrorailpune


उपहास समजून घेता आला पाहिजे. ही उपहासात्मक पोस्ट आहे असे लिहिले तर त्यातली सगळी मजा जाते. आपण एवढ शिकलोय, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करतो पण त्या नादात उपहास समजून घेण्यात कमी पडत आहोत #निरीक्षण
आषाढच्या शेवटच्या रात्रीची ब्रेकिंग न्यूजचे सूत्र कोअर पुणेकर आहेत. मी व्हायरल झालेला मेसेज ट्विट केला, पण याचे क्रेडिट त्यांचेच आहे.
दिल्लीत वेगवान घडामोडी. अमित शहा हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला. नरेंद्र मोदी नुकतेच राष्ट्रपतींची भेट घेऊन आलेत. शरद पवार यांचे नाव उपराष्ट्रपती म्हणून जवळपास नक्की. त्याबदल्यात शरद पवार गटाचे ९ खासदार भाजपला केंद्रात पाठिंबा देणार सूत्र.
आषाढच्या शेवटच्या रात्रीची #ब्रेकिंगन्यूज दिल्लीत वेगवान घडामोडी अमित शहा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीला. नरेंद्र मोदी नुकतेच राष्ट्रपतींची भेट घेऊन आलेत. #शरदपवार यांचे नाव उपराष्ट्रपती म्हणून जवळपास नक्की. त्याबदल्यात पवार गटाचे ९ खासदार भाजपला केंद्रात पाठिंबा देणार
राज्यात दोन दिवसांपासून शांतता आहे नै का ? म्हणजे ती नसली तरी शांतता वाटत आहे. कोकाटे, गायकवाड, शिरसाट , पडळकर, आव्हाड यांच्या लक्षवेधी बातम्या दिसल्या नाहीत की कानावर आल्या नाहीत. ज्या आहेत त्यात काही विशेष नाही. फडणवीस साहेब काय करणार आहेत काय माहिती. #MaharashtraPolitics
शेतकरी मित्रांसाठी व्याख्यान विषय: रम्मी पिकाची पेरणी कशी करावी? रम्मी पिकाचा फायदा, उत्पन्न आणि धोका. वक्ते : शेतकर्यांचे मित्र #माणिकरावकोकाटे, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य निमंत्रीत : महाराष्ट्र विधीमंडळ प्रायोजक : सर्व कृषी विमा कंपन्या स्थळ : मुंबई #manikraokokate

#पुणे ठेकेदारधार्जन वृत्तीमुळे महापालिकेचा घनकचरा विभाग पोखरला आहे. आधी माणूस फिक्स होतो मग टेंडरच्या नियम अटी, कामाचा स्कोप, खर्च ठरतो. रिंग होत असल्याने नैसर्गिक स्पर्धा होतच नाही. त्यामुळेच अस्वच्छता, दुर्गंधी निर्माण होत आहे. हे माहिती अजूनही कारभारी डोळेझाक करत आहेत. #pune

#पुणे रविवारी #कोथरूड, औंध, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, संगमवाडी भागातील पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे पर्वतीवरून SNDT कडे जाणारी जलवाहिनी फुटली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. पाणी पुरवठा विस्कळीत असणारा भाग खाली इमेज मध्ये आहे. #pune #PuneNews

#राजठाकरे भाजपचा खासदार दुबे काय म्हणाला? पटक के मारेंगे? गुन्हा दाखल झाला का? दुबे, तुम् मुंबई मे आ जावो, समंदर मे डुबे डुबे कर मारेंगे. आजच्या भाषणात लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यावरही टीका केली. इतक्या वर्षात प्रथमच त्यांच्यावर टीका करणारा नेता बघितला. चूक की बरोबर?
स्वच्छ भारत अभियानात पुण्याचा देशात 8वा क्रमांक आला. यावर आयुक्त नवल किशोर रामांना प्रतिक्रिया विचारली. ते म्हणाले, #पुणे मनपा सादरीकरण भारी करते पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. पुणेकरांच्या मनात स्वच्छतेबद्दल कितवा क्रमांक आहे हे महत्त्वाचय. आयुक्तांनी मर्मावर बोट ठेवलय #pune
#पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी बोगस काम व निकृष्ट काम करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतलाय. जेवढ्या निविदा काढल्या, त्याताली १० % कामांची तपासणी करण्याचे दक्षता विभागाला आदेश. राम यांनी पदभार स्विकारल्यानंतर बऱ्याच चुकीच्या गोष्टींकडे लक्ष दिले आहे. #pune
विधीमंडळातील राडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा बऱ्या वाटाव्यात अशी स्थिती निर्माण झालीय. राजकारणाच्या आखाड्यातील भांडणे विधीमंडळात आणली. अर्वाच्च भाषा पडळकर, आव्हाड वापरतात. कार्यकर्ते राडा घालतात. त्यांचे नेते त्यांना पाठिशी घालतात. महाराष्ट्राचा बिहार झालाय #पावसाळीअधिवेशन२०२५
#स्वच्छभारतअभियान 2024च्या स्पर्धेत #पुणे शहराचा देशात आठवा क्रमांक 2019: 37वा 2020: 15वा 2021: 5वा 2022: 9वा 2023: 9वा 2024: 8वा #इंदूर सलग आठव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. #pune #punenews #swachhaBharatAbhiyan @PMCPune @mohol_murlidhar @ChDadaPatil
कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट व्हाया सह्याद्री हॉस्पिटल व्हाया मणिपाल हॉस्पिटल या पद्धतीने #पुणे महापालिकेची जागा कशी विकली गेली याचा पुरावा या नोटीशीतून समोर आला आहे. सह्याद्री हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल मधल्या डील मधील डेक्कन कॉर्नरच्या हॉस्पिटलचे डील गोत्यात येणार आहे #pune

लोकमान्य टिळक यांचे पणतू, "केसरी"चे विश्वस्त संपादक डाॅ. दीपक जयंत टिळक यांचे दुःखद निधन 🙏 सकाळी ८ ते ११ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यात असणार. दुपारी १२वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. #Pune #पुणे

#पुणे पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी #पोर्शे चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालविण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज बाल न्यायालयाने फेटाळला आहे. #Porsche #punenews