Dr Sanjay Janwale
@SJanwale
paediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast ‘बलशाली भारत होवो’, हे ब्रीद मनाशी बाळगून तुम्हाला धावण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे माझे ध्येय आहे.
आज ६५ किमी! शनिवारी रात्री १२ वाजता धावण्याचा आरंभ करत सकाळी ८.४५ पर्यंत ६५ किमी अंतर धावत पार केले. बीडच्या बालाघाट या डोंगररांगात सराव केला. आज सह्याद्रीपर्वताला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. सातारा ते कास रस्ता व पुन्हा सातारा असा हा उंचच उंच हिल केलेला रन

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ रेस मध्ये ९० किमी अंतर ११ तास ३७ मिनिटात पार केले. हा अनुभव दै लोकमत मध्ये प्रकाशित झाला. मी आभार मानले. समीर मराठे यांनी दिलेला रिप्लाय मनाला भिडणारा होता; तो मी माझ्या मनाच्या गहिऱ्या कप्प्यात कायम जतन करुन ठेवला आहे. @MarathiRT



आज सकाळी धावायला सुरुवात केली तेंव्हा कळले की,इमामपुर-वांगी परिसरात दोन दिवसापूर्वी एका बिबट्याने कितीतरी शेळ्यांचा फडशा पाडला. ही अफवा आहे की वास्तव हे देवालाच माहित. धावताना मनात भीतीची लकीर उमटली. वारा सुटला होता. चढउताराच्या रस्त्यावर २१ धाव घेताना बिबट्या नाही पण मोर दिसला.

तिला तिच्या आईबाबानी तर तिने चक्क तिच्या बाहुलीला उपचारासाठी आणले होते. मग मी त्या बाहुलीला तपासले, ड्रेसिंग केली तेंव्हा त्या चिमुरडीचा आनंद गगनात मावत नव्हता अन् तिच्यामुळे मला झालेला आनंदही! ❤️
Ultra Marathon ही मॅरेथ़ॉनच्या पुढची पायरी. अनेकांना रोजचं चालणं किंवा धावणंही जमत नाही तिथे #Marathon आणि अल्ट्रा मॅरेथॉन हे स्वप्नच बनून राहतं. डॉ. संजय जानवळे यांनीसुद्धा आपण कधीतरी #अल्ट्रामॅरेथॉन धावू असा विचार केला नव्हता. पण #बीड शहरातील एका छोट्या धावण्याच्या स्पर्धेतील…
The Amol Annadate Podast मध्ये दक्षिण आफ्रिका येथे ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉन' पूर्ण करणारे बीडचे डॉ. संजय जानवळे यांच्यासोबत गप्पा. धावण्याचे महत्त्व, Running आणि Fitness यासंबंधी इंटरेस्टींग माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट जरूर पाहा. youtu.be/qGtpgqqEK1s?si…
The Amol Annadate Podcast मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक ९० किमी ची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बीडच्या डॉ. संजय जानवळे या मराठी डॉक्टरसोबत संवाद. संपूर्ण मुलाखत पहा आज रात्री फक्त. youtube.com/@DrAmolAnand वर
डॉ.सविता पानट यांचं निधन झालं.एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असताना त्यांनी स्त्रीरोग,प्रसूतीशास्त्र हे विषय शिकवले. कडक शिस्त,समजून सांगण्याची अनोखी शैली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू.त्यांची शिकवण मनाच्या कोपऱ्यात जतन केली.अश्रुभरल्या डोळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली!

आज बीड पिंपळनेर रस्त्यावर दोन तास २१ मिनिटात २१ किमी धावण्याचा आनंद घेतला..

बालपणी तंबाखूसेवन वा धुम्रपान करण्याचे व्यसन का लागत असेल? मी लहान होतो तेंव्हा माझ्या आजीची कामवाली बीडी ओढत असे. मलाही त्या बीडीचे आकर्षण वाटायचे. मी तिची बीडी घ्यायचो अन् कृपया, व्यक्त व्हा. तुमचे मत कुणासाठी दिशादर्शक ठरु शकेल, पालकांना विचार करायला लावेल.

सहासष्ट कलेची देवता, शक्तिपीठ योगेश्वरीदेवीच्या अंबेजोगाई येथे, आद्यकवी मुकुंदराज,मराठवाडा मुक्ती संग्रामाचे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यभूमीत माजी आमदार पृथ्वीराज साठे, पोलिस अधिकारी शरद जोगदंड, अरुण काळे, यांच्या हस्ते माझा सत्कार होणे,ही माझ्यासाठी गौरवाची बाब ..

देशात प्रौढ आणि मुलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. शहरात पाच पैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे. बालपणापासून असलेल्या आहाराच्या सवयी लठ्ठपणाला जबाबदार असतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि काही विशिष्ट कर्करोग यासारख्या आजारांचा धोका वाढतो.

कसे आहे? माझा शाळकरी दोस्त व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी माझे हे व्यंगचित्र रेखाटले आहे..

माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या या भरभरून शुभेच्छा पाहून माझ्यासमोर आज एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे की,या मायबाप लोकांनी दिलेले हे अमाप प्रेम यापुढे कसे टिकवाचे? कृष्ण भेटीनंतर सुदाम्याला कदाचित हा प्रश्न नक्कीच पडला असेल,आज मी तो सुदामा झालो आहे.

डॉ. आनंद देशपांडे. लेकरांच्या आरोग्यासाठी अविरत झटणाऱ्या देशपांडे सरासारख्या सर्व देवदूतांना माझा सश्रद्ध सलाम. #HappyDoctorsDay #explore #viral #Trending

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, हे ब्रीद मनाशी बाळगून कार्य करत असलेल्या या खाकीवर्दीतल्या समाजरक्षकांनी माझा गौरव केला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो व पोलिस अधिकारी श्री शीतलकुमार बल्लाळसाहेब व त्यांचे सहकारी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो..

‘योग’ केवळ शरीर वाकवणे,आसने करणे एव्हढेच नसते, तो फिटनेस राखण्याचा एक मार्ग आहे, असेही नाही. योग म्हणजे मनाचा व्यायाम! योग’, या शब्दाचा अर्थ -जोडणे असा होतो.या डिजिटल युगात मानसिक हल्लकल्लोळ वाढल्याने भिरभिरत्या मनाला जेंव्हा शरीराशी,श्वासाशी, वर्तमानाशी जोडतो तेंव्हा योग घडतो.

आ. खासदार श्री बजरंग सोनवणे उर्फ बप्पा, नमस्कार! आपण माझे कौतुक केले, प्रोत्साहित केले त्यामुळे मनोमन खूप आनंद झाला. पुन्हा नव्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची नवी उर्मी जागृत झाली. असेच प्रेम कायम असू द्या! धन्यवाद @bajrangsonwane_


आजवर मी अनेक मॅरेथॉन धावलो. पण ९० किमी अन् तेही चढउताराच्या अवघड रस्त्यावर होईल की नाही, शंका होती. कारण एव्हढे अंतर धावण्यासाठी उभे राहण्यासाठीच मुळात हिंमत लागते. मी मनाची तयारी करत होतो. मन खंबीर केले तेंव्हा डोळ्यात आत्मविश्वास आला..
