Sharad Pawar
@PawarSpeaks
President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
अन्नसाखळी असो किंवा जैवविविधता.. वाघासारख्या उमद्या जनावराचं अस्तित्व अनेक अंगाने उपयुक्त आहे. आजच्या घडीला जंगलात वाघ पाहणं ही एक पर्वणीच आहे. त्यामुळे व्याघ्र गणना वाढण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहूया !

जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना…

डॉ. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य जगभरातील तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. भारताचे अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. भारताला वैज्ञानिकदृष्टया सक्षम करणारे, देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना स्मृतीदिनी विनम्र…

कारगिल युद्धात आपलं सर्वस्व पणाला लावून निकरानं झुंज देणाऱ्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्य दलातील शूर जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन!

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" मानवी सहजीवनासाठी जशा पायाभूत सुविधा हव्यात, तसंच जंगलही हवीत. निसर्गाचा हा समतोल साधतच आपलं प्रत्येक पाऊल उचललं गेलं पाहिजे. म्हणूनच निसर्गाने वनांच्या रूपाने आपल्या पदरी टाकलेलं दान सांभाळण्याचा आजच्या दिनी निर्धार करूया.

चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीतून आपल्या क्रांतीकारी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले मोलाचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. प्रखर देशभक्त आणि कुशल संघटक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षण केलं, राजकीय स्वातंत्र्यासाठी भारतीय समाज एकसंधपणे लढावा यासाठी अतीव प्रयत्न केले. आपल्या प्रभावी लेखणीतून त्यांनी क्रांतीचं बीज रोवलं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरोधात भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा स्वराज्य निष्ठा जागृत करणारे, भारतीय…

खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील निवृत्त शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यादरम्यान निवृत्तीवेतन, आरोग्यविमा, शिक्षक कल्याण निधी व अन्य शैक्षणिक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. निवृत्त शिक्षकांच्या सर्व प्रश्नांचा योग्य तो पाठपुरावा केला…




‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे जी आपला आज वाढदिवस. भारतीय विचारधारा संक्रमणाच्या अवस्थेतून जात असताना एखाद्या ज्येष्ठ राजकीय नेत्याने जी प्रगल्भता दाखवायला हवी, जो समन्वय साधायला हवा त्यात आपण आम्हा सर्वांसमवेत बजावत असलेली भूमिका अत्यंत मोलाची…

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात बंड पुकारून, थोर क्रांतिकारक मंगल पांडे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी पेटवली. स्वातंत्र्याची ओढ आणि पारतंत्र्याची चीड या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी जीवनाच्या अंतापर्यंत लढा…

नेल्सन मंडेला यांनी ब्रिटिश सरकारच्या वर्णभेदी धोरणाचा कडाडून विरोध केला. साम्राज्यवाद व गरिबी विरोधातही त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष केला. जगभरात समानता व एकता प्रस्थापित करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेले, भारतरत्न नेल्सन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दलित व श्रमिकांच्या उद्धारासाठी अण्णाभाऊ कायम प्रयत्नशील राहिले. आपल्या प्रभावी लिखाणातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. ‘महाराष्ट्राची परंपरा’ या पोवाड्याच्या माध्यमातून 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' खोलवर रुजवणारे ख्यातनाम…

लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि 'केसरी'चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. डॉ. टिळक यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणाचा आणि आईकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा अत्यंत जबाबदारीने आणि उल्लेखनीय कार्यातून नेहमीच जपला. शिक्षण, पत्रकारिता…

शंकरराव चव्हाण यांची ओळख प्रामाणिक, शिस्तप्रिय, शांत आणि अभ्यासू नेत्याच्या रूपात होती. प्रशासनात पारदर्शकता आणि सुशासन यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकास, सिंचन योजना, शिक्षण आणि प्रशासन सुधारणा या क्षेत्रांमध्ये ठोस पावले उचलली. माजी…

समाजात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आगरकरांनी प्रभावी भूमिका घेतली. त्यांनी आपल्या विचारांमधून व कृतीतून विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक समतेचा मार्ग दाखवला. 'सुधारणा हीच खरी प्रगती' या विचाराला अनुसरून, सामाजिक सुधारणेसाठी आयुष्य…
