डॉ. विश्वंभर चौधरी
@DrVishwam
Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.
प्रफुल्ल लोढा भाजपाचा कार्यकर्ता आणि गिरीश महाजनांचा निकटवर्ती आहे एवढी एक किरकोळ बाब वगळता बातमी सविस्तर आहे. जामनेरमधील कार्यकर्ता आहे. गिरीश महाजन यांच्याकडे चौकशी केली तर लोढाचे तपशील मिळू शकतील. महाराष्ट्र भाजपाच्या चारित्र्यसंपन्नतेत मानाचा आणखी एक तुरा!


अभिनंदन! स्वतःच्या पक्षाचे तब्बल 132 आमदार असतांना संजय शिरसाट, दादा भुसे, नीतेश राणे, संजय राठोड, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, योगेश कदम अशा मंत्र्यांना सहन करणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिलेच मजबूर मुख्यमंत्री ठरले आहेत!
विधिमंडळाच्या आवारात मकोका लावलेले गुंड येऊन हाणामारी करतात हे दृश्य महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासात पहिल्यांदाच दिसलं आहे. विरोधी पक्षांनी विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांचा राजीनामा मागायला हवा. विधिमंडळ गुंडांचा आखाडा व्हावा हे खेदजनक आहे.
शिरसाट यांच्या भाषणाचा आणखी व्हिडिओ बाहेर आलाय. म्हणताहेत, पैशाची चिंता करु नका. बॅग पाठवून देतो! शिंदे टोळीची धमाल! #Eknathshinde
काँग्रेस,राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना(उबाठा)यांनी एक श्वेतपत्रिका काढून लोकशाही आणि संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाला एकमतानं का पाठिंबा दिला हे लोकांना सांगावं.संविधान फक्त मतं मिळवण्याचं मशीन वाटत असेल तुम्हाला तर लोक विरोधी पक्षाचाही नवा पर्याय उभा करतील हे विसरू नका.
यशवंतराव चव्हाण काळात तर्कतीर्थ,पद्मश्री विखे, गाडगीळ,पंजाबराव देशमुख, दादासाहेब रुपवते,वसंतराव नाईक अशी थोडीच माणसं नावारूपाला आली.फडणवीस-शिंदे काळात फुके,कंभोज,महाजन,दोन राणा,पडळकर,सदावर्ते,सत्तार, बांगर,गायकवाड,लाड,शिरसाट, शहाजीबापू,आचार्य अशी खूप थोर माणसं नावारूपाला आली.
मीराभाईंदरमध्ये परप्रांतीयांना आंदोलनाचा हक्क देऊन आणि मराठी माणसाला तो हक्क नाकारत धरपकड करतांना भाजपानं आम्ही महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही आहोत, जा करा काय करायचं ते, असा स्पष्ट संदेश दिला. मराठी माणसाला विनंती आहे की दरवेळी कोणताही विचार न करता कृपया कमळाचंच बटण दाबावं.
मराठी माणूस एकत्र करायचा आणि अमराठी लोकांचं भाजपकडे गठ्ठीकरण (ध्रुवीकरण) होऊ द्यायचं नाही. भांडण हिंदीशी नाही, भाजपाशी आहे. आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. तेही पूर्णतः अहिंसक राहून.
मुख्यमंत्र्यांनी सदानंद मोरे सरांना मुलाखत घ्यायला लावून महाराष्ट्र धर्मावर बोलणं हा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतरचा पहिला वैचारिक विजय आहे. महाराष्ट्र धर्म भाजपाच्या हिंदुत्वाला भारी पडणार हे भाजपाला कळलेलं आहे असा या मुलाखतीचा अर्थ.